
प्रतिनिधी निलेश सुर्वे हिंगोली..
सविस्तर वृत्त असे की काल दुपारी तीनच्या सुमारास नातेवाईकांनीच तरुणीला घरी येऊन किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने वार करत तिचा खून केला. या प्रकरणामध्ये गोरेगाव पोलिसांनी तातडीने हालचाली करून आरोपीला दिनांक 21 फेब्रुवारी सकाळी आरोपीला ताब्यात घेतले. गोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील तरुणी संजना गजानन खिल्लारी (19) ही शिक्षण घेत होती.. गुरुवारी 20 तीन च्या सुमारास संजना तिच्या घरी अभ्यास करीत होती. यावेळी राहणारा तिचाच नातेवाईक अभिषेक संजय खिल्लारी हा विचारपूस करीत तिच्या घरी आला. व संजना कुठे आहे अशी विचारणा त्यांनी केली.सदर मुलगी ही तिच्या घराच्या छतावर अभ्यास करीत बसली होती. विचारपूस करीत आरोपी हा छतावर गेला व तू माझी बदनामी का केलीस या सूड भावनेने कसलाही विचार न करता त्याने संजनावर धारदार शस्त्र आणि वार केले. व ती रक्ताच्या थारोळ्यात पडली तिथून आरोपीने लगेच पळ काढला. यावेळी आरडाओरड झाल्याने तिचे कुटुंबीय मदतीसाठी वर धावले असता तोपर्यंत आरोपी हा फरार होण्यात यशस्वी झाला. तिच्या कुटुंबियांनी तिला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णाला दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीअंती ती मृत झाल्याचे जाहीर केले. याप्रकरणी अशोक खिल्लारी यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला..
Discussion about this post