

…………………………………………
5 मार्च 2025 रोजी आझाद मैदानावर निघणाऱ्या ‘मांगवीर महामोर्चा’ ला सकलचे संस्थापक जेष्ठ साहित्यिक अण्णा धगाटे, पुणे यांनी परभणीत येऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. सकलचे संस्थापक अण्णा धगाटे हे मांगीर महामोर्चाची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरून समाज बांधवांना तयार करत आहेत. या राज्यव्यापी दौऱ्यानिमित्त परभणी शहरातील सावली विश्रामगृहात 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी बैठक संपन्न झाली. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासाठी नेमलेली न्यायमूर्ती अनंत बद्दर समिती क्रियाशील आणि गतिमान करण्यासाठी मांगवीर महामोर्चा अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे. त्यामुळे या महामोर्चात हजारोच्या संख्येने मातंग समाजाने सहभागी झाले पाहिजे असे अवाहन अण्णा धगाटे यांनी केले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी लसाकमचे प्रदेशाध्यक्ष राजेश उफाडे होते. या बैठकीत अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे, राज्य उपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार, लाल सेनेचे कॉम्रेड गणपत भिसे, एकता हमाल युनियनचे नेते रोहिदास नेटके, लाल सेनेच्या सारजाबाई भालेराव, लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष इंजिनिअर अण्णासाहेब तोडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माऊली साळवे, विकी गोरे, उत्तम गोरे, अशोक उबाळे, साईनाथ साबळे, व्यंकटराव सोनटक्के, गोपीनाथ सूर्यवंशी, नागेश तादलापूरकर, अनिल मोहिते, त्रिंबक भिसे, प्रदीप उर्फ पप्पू वाघमारे, संजय लोखंडे, लखन वाघमारे, प्रल्हाद उबाळे, निखिल सरोदे, मनेष गायकवाड, शैलेश साबळे, नितीन वाघमारे, अण्णाभाऊ उबाळे, महादेव गायकवाड, सुनील लोंढे, अशोक भारसाकर, राणी गवळी, के. के. भारसाकळे, निवृत्ती नितनवरे, किशोर कांबळे, सिद्धांत भिसे आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन एल. डी. कदम यांनी केले..
Discussion about this post