
तडवळा येथील रहिवाशी मधुकर माणिक कानगे त्याचां मुलगा सुरज मधुकर काणगे या दोघांना गावातील राहणारा गावगुंड विवेक विश्वनाथ उबाळे राहणार तडवळा या व्यक्तीने दारूच्या नशेत हातामध्ये धारदार कोयता घेऊन त्यांचा पाठलाग करत जातीवाचक शिवीगाळ मांगानो मांगठ्यांनो तुम्हाला गावात राहू देत नाही. जीवेच मारणार तुमची लायकी नाही आमच्या गावात राहण्याची म्हणत मधुकर कानगे यांच्या डोक्यात दगडाने व मुलगा सुरज याच्या डाव्या हातावर धारदार कोयत्याने जबर असा वार केला. भीती पोटी सुरज धावत आपल्या घराकडे गेला त्याच्या मागे विवेक विश्वनाथ उबाळे हा मारेकरी सुद्धा धावत कोयता घेऊन त्याच्या घरी गेला.सुरज चे रक्त बघून बहिण घाबरली व तिच्यावरही कोयता उगारत अंगावर येत आस्ता बघुन
तिने आपल्या घराचे दार लावून घेतले. हल्लेखोर विवेक विश्वनाथ उबाळे यांनी घरावरती लाथा दगड मारून गहाण अशा शिव्या गाळी करत तुम्हाला गावात जगूच देत नाही खलास करून टाकतो. माझे पोलीस काहीच वाकडे करू शकत नाही असे म्हणत तो निघून गेला. भयभीत कानगे कुटुंब हे पुन्हा तडवळा पोलीस स्टेशन येथे गेले असता तिथे आरोपी विवेक विश्वनाथ उबाळे याचे प्रशासनाशी संबंध निकट आहेत असे दिसता त्यांनी ढोकी पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. सदरील घटना पोलीस स्टेशनला सांगितली आहे.सुरजला जिल्हा शासकीय रुग्णालय धाराशिव येथून सोलापूरकडे रेफर केले आहे.आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मातंग समाजाचे कुटुंब प्रयत्न करत आहे. या प्रकरणाकडे जिल्ह्यातील सर्व संघटना नेते समाज बांधव यांनी लक्ष घालून पाठपुरावा करणे गरजेचे आहे.जेणेकरून नंतर हा गावगुंड मागासवर्गीय यावर अन्याय अत्याचार करणार नाही. अशा गावगुंडांना कायद्याची जरब बसवणे गरजेचे आहे..
✊✊✊✊✊✊
या घटनेचा प्रकरणाचा पाटपुरावा लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्य अध्यक्ष संतोष भाऊ मोरे प्रसिद्धी प्रमुख विकास दादाराव गायकवाड हे लक्ष देऊन करत आहेत..
Discussion about this post