
गंगापूर प्रतिनिधी..
सुनील झिंजुर्डे पाटील..
तब्बल 108 दिवस व 4000 किमी पायी प्रवास करत नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या तिखे व वाघ यांचा शिंगी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करत सत्कार करण्यात आला. मनात एखादी गोष्ट करायचीच असा आत्मविश्वास व जिद्द जर असेल तर अशक्यप्राय वाटणारी गोष्ट सुध्दा शक्य होते. याचेच एक मुर्तीमंत उदाहरण म्हणजेच शिंगी नामदेव जगन्नाथ वाघ, हरिचंद्र आसाराम तिखे, इंद्रायणी हरिचंद्र तिखे येथील होत. नर्मदा परिक्रमा पुर्ण करण्यासाठीचा पायी प्रवास या तिघांनी साडेतीन महिन्यापुर्वी सुरू केला.
उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता भक्तीरसात न्हाऊन गेलेल्या या तीन भक्तांनी 08 नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथून जल घेवून मध्यप्रदेश, महाराष्र्ट(नंदूरबार) , गुजरात व छत्तीसगड या चार राज्यातून वाहणाऱ्या नर्मदा नदीच्या परिक्रमेला सुरूवात केली. जंगल, दरी, डोंगर असा खडतर प्रवास करून पुष्पदंतेश्वर, मनी नागेश्वर, गायत्री मंदीर, हरसिध्दी माता, जलाराम आश्रम, कुंभेश्वर, शुलपानेश्वर, हनुमंतेश्वर अशा तीर्थक्षेत्राचे दर्शन घेत 18 फेब्रुवारी रोजी 108 दिवसांचा व 4000 कि.मी. प्रवास पुर्ण करत ओंकारेश्वर येथे येवून ही यात्रा झाली. 18 फेब्रुवारी रोजी नामदेव जगन्नाथ वाघ, हरिचंद्र आसाराम तिखे, इंद्रायणी हरिचंद्र तिखे यांचे शिंगी नगरीत आगमन झाले. यावेळी समस्त शिंगीकरांच्या वतीने त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला..
Discussion about this post