
प्रतिनिधी :- विकास आग्रे..
आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाला सुरुवात करून संत शिरोमणी रोहिदास महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन झाले. कार्यक्रमाला उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख- रमेश मोरे, रोहीदास विकास मंडळ माणगाव अध्यक्ष संतोष पुगांवकर, सत्कार ग्रामीण फाउंडेशन रायगड संस्थापक अध्यक्ष जितु पवार, पत्रकार नंदकुमार चांदोरकर, तसेच प्रमुख वक्ते सहादेव गोरेगावकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संत रोहिदास मंडळ पुरारचे अध्यक्ष नितेश पुरारकर यांनी केले व प्रस्तावना सादर करून उपस्थितांना संबोधित केले. प्रमुख पाहुणे, मान्यवर मंडळी, वक्ते , व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाॅल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख मान्यवर मंडळींनी संत रोहिदास महाराजांचे विचार आणि त्यांचे कार्य उपस्थितांना संबोधित करुन मार्गदर्शन केले. सर्वच संत रोहिदास विकास मंडळ पुरारचे अध्यक्ष, पदाधिकारी, महिला मंडळ यांनी अतिशय सुंदररित्या कार्यक्रम पार पाडला. रोहीदास विकास मंडळ माणगाव तालुका अध्यक्ष संतोष पुगांवकर , उपाध्यक्ष मारुती पाबरेकर,अनिल महाडीक , सत्यवान आंबेतकर, नरेंद्र दिवेकर, प्रशांत आंबेतकर , समाजसेवक मंदार चांदोरकर, सहादेव गोरेगावकर, चांदोरेचे सचिव चंद्रकांत चांदोरकर , संतोष गोरुले , कवि लेखक विकास आग्रे व मुस्लिम समाजाचे स्थानिक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता मंगेश पुरारकर यांनी करुन उपस्थितांचे आभार व्यक्त केले..
Discussion about this post