
शैलेश मोटघरे..
गोंडऊमरी/रेल्वे :
राजा शिवछत्रपती जयंतीनिमित्त गोंडऊमरी येथील कोकणा रेल्वे फाटक परिसरात उबाठा शिवसेनाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ या अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष विश्वनाथ चांदेवार, सचिव डॉ.सुरेश ब्राम्हणकर, कृष्णा भराडे, भागवत चोपकर, प्रकाश माध्येकर, शंकर कुंभरे आदींसह शिवभक्त उपस्थित होते..
Discussion about this post