
दरवर्षीप्रमाणेच आज देखील बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकॅदमी यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार २०२५ पुरस्कार सोहळा मोठा उत्साहात संपन्न झाला आहे.
मुख्यमंत्री श्री चंद्रकांत कवलेकर यांच्या उपस्थितीत लातूरचे मा.आमदार श्री सुनील गायकवाड यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध राष्ट्रीय पुरस्कार २०२५ या पुरस्काराने श्री जीवन विठ्ठल धोत्रे यांना देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. जीवन धोत्रे हे वर्किंग जर्नालिस्ट ऑफ इंडिया दिल्ली सदस्य महाराष्ट्र राज्य यांच्या सन्मानित त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.
विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्याना हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले. याप्रसंगी अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक राज्यातील दिग्गजांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन ॲकॅदमी तर्फे त्यांचे सत्कार करण्यात आले .
हा सोहळा गोवा येथील पाट्ट बस स्थानका जवळील कला विज्ञान संस्कृती भवन पंजिम येथे संपन्न झाला आहे .या कार्यक्रमासाठी सिने अभिनेते झाकीर खान, नागपूर विद्यापीठाची मा. उप कुलगुरू डॉ. एस एन पठाण, अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. एन एस खोबा, डॉ. संदीप खोचर, प्रदेशाध्यक्ष प्रथमेश अबनवे, प्राध्यापक डॉ. बी एन खरात, प्राध्यापक गोरख साठे, पपेतल्ला रविकांत, महेंद्र सिंग, धनंजय डांगळे तसेच मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते..
Discussion about this post