प्रशांत पाटील / अहिल्यानगर-
संपूर्ण अ.नगर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या अ.नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सन२०२५. – २०३० या कालावधीसाठी होत असलेली पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. या निवडणुकीत राहाता तालुक्यातील श्री गणेश विद्याप्रसारक मंडळ गणेशनगर या संस्थेचे गोरक्ष उत्तमराव निर्मळ,उत्तम भागवत कांदळकर, संजय अशोक तुरकणे व भाऊसाहेब रामराव धनवटे आदी चौघांनी सर्व साधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी दाखल केले आहेत.या वेळी परीवर्तन मंडळाचे अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, राजेंद्र लांडे, आप्पासाहेब राहाणे तसेच मुख्याध्यापक संघाचे सुनिल पंडीत, रमेश जोशी, सोपानराव हिरगळ तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post