शशिकांत तांबे – प्रतिनिधी देवळा ..
देवळा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सुर्यवंशी यांच्या सुचनेनुसार देवळयाचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सपोनि पुष्पा आरणे यांच्या पथकाने दिनांक 21 रोजी देवळा मालेगाव रोड वरील हॉटेल वेलकम येथे धाड टाकून याठिकाणी चालू असलेल्या अवैध वैश्या व्यवसायावर कारवाई करून दोन पिडीत महिलांची सुटका केली असून या प्रकरणी हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनांक 21 रोजी अपर पोलीस अधीक्षक यांना मिळालेल्या माहितीनुसार देवळा पोलिस ठाणे हद्दीतील मालेगाव रोड जवळील हॉटेल वेलकम येथे हॉटेल मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे.रा.देवळा हे हॉटेल वर गरजु महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्वःताच्या आर्थिक फायद्यासाठी वैश्या व्यवसायासाठी आणुन त्यांना सदर हॉटेल मध्ये डांबुन ठेऊन त्यांच्या कडून बळजबरीने वैश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती..
Discussion about this post