
पानकनेरगाव : सेनगाव तालुक्यातील
पानकनेरगाव येथे महाशिवरात्री महोत्सवाची तयारी करण्यात येत आहे.
पानकनेरगाव येथील प्राचिन शिवालय, जागृत देवस्थान श्री मानकेश्वर येथे महाशिवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. या ठिकाणी मंदिराची रंगरंगोटी, साफसफाईची कामे करण्यात येत आहेत. शिवाय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, मंगलताई हेंद्रे यांच्या वतीने महाप्रसादासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो.
या वर्षीही महाशिवरात्री महोत्सवात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पानकनेरगाववासीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post