उदगीर/कमलाकर मुळे: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणास प्रारंभ झाला आहे.यामध्ये शिक्षकांना अत्याधुनिक प्रणालीचे धडे दिले जाणार आहेत. तालुक्यातील लोणी येथील मातोश्री मीनाताई ठाकरे प्राथमिक आश्रम शाळेत शिक्षक वृद्धी प्रशिक्षण टप्पा दोन ला सोमवार 17 तारीख सुरुवात झाली .प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी गटशिक्षणाधिकारी एस.के.शेख व शिक्षण विस्तार अधिकारी नितीन लोहकरे ,राजेंद्र मळभागे , केंद्रप्रमुख भोसले ,रमेश जाधव, डी .एस. जाधव , एस. ए .दायमी जी. पी. भोळे आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कौशल्य जे चार जे चार सी म्हणून ओळखले जातात .ते अवगत करून स्वतःमध्ये विकसित करावी .शिक्षकाला प्रभावित करणारी पाच तत्त्वे महत्त्वाची आहेत.तुमचा अंगीकार करून त्यांचा सहसंबंध विद्यार्थ्यांचा गुणवत्तेशी जोडावा असे आवाहन शिक्षण विस्तार अधिकारी लोकरे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये डी. एस. जाधव यांनी नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी बाबत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याने सांगतीले. सूत्रसंचालन रमेश जाधव यांनी केले तर आभार मानले.
Discussion about this post