
यावल । प्रतिनिधी फिरोज तडवी..
तालुक्यातील परसाळे बुद्रुक ग्रामपंचायतीचे तिघं ग्राम पंचायत सदस्य जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसारनाशिक विभागीय आयुक्त यांच्या कोर्टातअपात्रतेची टांगती तलवार असून या निर्णयाच्या विरोधात नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे दाद मागितली होती, मात्र विभागीय आयुक्त नाशिक यांनी सदरच्या तिघं ग्रामपंचायत सदस्यांची विनंती अमान्य केल्यामुळे खडबड उडाली असून या निर्णयावर सत्तावीस फेब्रुवारी २५ रोजी नाशिक येथे निकाल होणार असल्याचे नोटीसित नमूद करण्यात आले आहे.
परसाळे बु.. ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य खल्लोबाई युनूस तडवी, मदीना सुभेदार तडवी, रमजान छबु तडवी यांना तिसरी अपत्य आहे त्यांना ग्रामपंचायत सदस्यत्वाचे वरून अपात्र करण्यात यावे यासंदर्भात कमाल काना तडवी / सिकंदर इस्माईल तडवी यांनी
महसुलविभागीय आयुक्त यांच्याकडे दाद मागितली होती त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या निकालानुसार यावरील तिघी ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र घोषित केले होते या निर्णयाच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी नाशिक विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते मात्र अप्पर आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांनी तिघं ग्रामपंचायत सदस्यांची मागणी अमान्य केली आहे. कनिष्ठ न्यायालयात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रारदार व त्यांच्या वकिलांनी तीन अपत्य असल्याने अहवाल पुराव्यासह दाखल केलेले होते. अपत्याचे अवलोकन करून स्थगिती मिळवणे बाबतची विनंती विभागीयअप्पर आयुक्त नाशिक अजय मोरे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १६ अन्वये अमान्य केली आहे तर या प्रकरणावर २७ फेब्रुवारी २५ रोजी निकाल देण्यात येणार असल्याचे या नोटीसित नमूद केले आहे..
Discussion about this post