
निलेश सोनोने.
ग्रामीण प्रतिनिधी पातुर..
अँटीकरप्शन बिरो.अमरावती पथकाने मोठी कारवाई करत पातुर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई पवन सुनील भाकरे वय 36 याला 3000 रुपयाची लाज घेताना रंगेहात पकडले न्यायालयाने आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रार कारत्याविरुद्ध पोलीस ठाण्यात देशी दारू विक्रीचे गुन्हे पूर्वी दाखल होते. तक्रारदाराने सध्या दारू विक्री बंद करून मजुरीचे काम सुरू केले होते मात्र आरोपी पोलीस शिपायाने त्याच्या मागील गुन्ह्याचा अभिलेखावरून तडीपाराची कारवाई न करण्यासाठी 5000 रुपयाची लाच मागितली. तक्रारदाराने 20 फेब्रुवारी रोजी एसीबी अकोला येथे तक्रार दाखल केली. तपासणी दरम्यान पोलीस शिपाई पवन भाकरे पंचा सक्षम पाच हजार रुपये वरून तडजोड करून 3000 रुपये स्वीकारण्यास संमती दिली. 21 फेब्रुवारी 2025 रोजी एसीबी पथकाने सापळा रचून आरोपीला तक्रार दरा करून 3000 रुपये स्वीकारताना रंगीहात पकडले. त्यानंतर पातुर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी आरोपी पोलीस शिपाई पवन भाकरे याला न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही आरोपीचा वक्तिवाद केल्यानंतर न्याय श्रीमती भताने यांनी आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे एडवोकेट राकेश अकोटकर यांनी काम पाहिले तर एसीबी अमरावतीच्या वतीने तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भरत जाधव उपस्थित होते. तसेच निर्भीड आणि कठोर पद्धतीने कारवाई सुरू राहिली तर प्रशासन नातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोठी मदत होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे.
एसीबी च्या कारवाईने पोलीस दलात खळबळ..
या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचार विरोधी विभागाने घेतलेल्या या धडक निर्णयामुळे लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वर दबाव वाढला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी विश्वास वाढला आहे..
Discussion about this post