शरद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी शरद आत्मनिर्भर अभियानाच्या मदतीने सोनकिरे येथील कार्यकर्त्यांकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गावातील वि.का.स. सोसायटीच्या पटांगणात घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन शरद लाड यांनी केले. सकाळी १० वा. पासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत १५० लोकांकडून रक्ताचे श्रेष्ठदान केल्याचे पाहायला मिळाले.
रक्तदान हेच श्रेष्ठदान असून तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करायला हवे. आपण दिलेल्या रक्तामुळे अपघात तसेच इतर कारणांनी पीडित असणाऱ्या एखाद्या गरजू रुग्णाचा जीव वाचू शकतो, याच विचारून आपण या सामाजिक कार्यात सहभागी होत असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.
यावेळी क्रांती कारखान्याचे संचालक वैभव पवार, शरद आत्मनिर्भर अभियानचे संचालक सुरेश शिंगटे, विनायक महाडीक यांच्यासह प्रमोद महिंद, धैर्यशील पाटील, संदेश जाधव, अधिकराव पाटील, सुशांत पाटील, अनिल कोकाटे, विठ्ठल यादव, सतीश जाधव, जितेंद्र पाटील, राहुल जाधव, अशोक पाटील, रायसिंग पाटील, श्रीहरी पाटील, मनोज पाटील, पंढरीनाथ कदम, उत्तम जाधव, रामचंद्र पोळ तसेच सोनकिरे गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post