
सावनेर : सुरक्षेच्या दृष्टीने सावनेर शहराचा कोपरा नि कोपरा सीसीटीव्हीत नजरबंद होणार आहे. जिल्हा नियोजन समितीने नुकतीच दोन कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे. येत्या काही काळात या सीसीटीव्ही कॅमेरा उभारणीला सुरुवात होईल.
एआय तंत्रज्ञानाने हे सीसीटीव्ही कनेक्ट राहणार असून गुन्हेगारांवर वॉच राहील. त्यामुळे सावनेरवासीयांना सुरक्षिततेबाबत मुळीच चिंता करण्याची गरज नाही. शहरात वाढत्या चोऱ्या, गुन्हेगारी, हिट अँड रन, घरफोडी अशा समस्यांना डोके वर काढले
पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ
मध्यप्रदेश सीमा, भोपाळ राष्ट्रीय महामार्ग, नागपूर छिंदवाडा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे अपघाताची संख्या अधिक आहे. घरफोडीच्या घटनांचा ग्राफ अधिक आहे. मध्यप्रदेशातील गुन्हेगार सावनेर शहरात प्रवेश करून गुन्हा करतात. त्यानंतर वाहनाने पसार होतात. गोवंश तस्करी, तंबाखू तस्करी, दुखापतीचे गुन्हे, अवैध दारू वाहतूक, अमलीपदार्थ, वाळूतस्करी या घटना सर्वसामान्य आहे. या सर्वांवर अंकुश लावण्यात पोलिसांना कसरत करावी लागायची, पण आता मात्र कॅमेऱ्यांची मदत होणार आहे.
आहे. मध्यप्रदेशची सीमा लागूनच असल्याने गुन्हेगारांचे आश्रयस्थान ठरू पाहत आहे. शहरात एकेकाळी एकाच रात्री चोरट्यांनी १६ दुकाने फोडली होती. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते. पुराव्यांअभावी आरोपी गुन्ह्यामधून सुटतात. अनेकदा अपघात
झाल्यावर आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी होतात. ते डिटेक्ट होत नाही. रोडरोमिओंद्वारे विद्यार्थिनींच्या छेडखानीमध्ये वाढ, बँकेच्या बाहेरून ग्राहकांचे पैसे लंपास करण्याचे प्रमाण वाढत आहे. या सर्व प्रकाराला वाचा फोडण्यासह आळा घालण्यासाठी
२५ ठिकाणी ९९ कॅमेरे
शहरात एकूण २५ ठिकाणी ९९ कॅमेरे ऑटोमॅटिक नंबरप्लेट रेकग्नेशन्स (एएनपीआर) आणि एआयशी आधारित असेल. संवेदनशील स्थळे चिन्हांकित करून फोर्स मल्टिप्लायर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये केला जाईल. त्यामुळे अतिशीघ्र गुन्ह्याची उकल करणे सहज शक्य होईल.
सावनेरातील व्यापारी संघ, सामाजिक संस्था, विविध धार्मिक संघटना, शहरवासी, विद्यार्थ्यांनी सावनेरातील मुख्य मार्ग, मुख्य चौक, शाळा व विद्यालयाबाहेर, बसस्थानकासमोर, शासकीय दवाखान्याबाहेर, मुख्य चौकातील स्मारकस्थळे, भाजी मार्केटच्या
ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली होती. या योजनेला मंजुरी मिळावी यासाठी आमदार डॉ. आशिष देशमुख, ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, साहाय्यक पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आदींनी प्रयत्न केले आहे.
Discussion about this post