संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान , मुर्तिजापुरचा मानवतावादी सुत्य उपक्रम
दैनिक सारथी महाराष्ट्राचा : तालुका प्रतिनिधी
मुर्तीजापुर : येथील संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान मुर्तीजापुर च्या वतीने कुष्ठधाम अनभोरा येथे वैराग्यमुर्ती श्री संत गाडगेबाबा यांचे 149 वी जयंती हर्षोनंदात साजरी. संत गाडगेबाबांच्या जयंती दिनीच 2016 ला स्थापित संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान , मुर्तिजापुर च्या वतीने अविरत बाबांच्या दससुत्रीतील संदेशांवर कार्य करण्याचा प्रयत्न असतो त्या अनुसंगाने गोर गरिब गरजू विद्यार्थी व वृध्दांसाठी तसेच करोना काळात ही शक्य तेवढे गरजू सहकार्य करुन मानवतेचा धर्म जपण्याचा प्रयत्न केला गेला. कु्ठधाम येथिल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीसंत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था मुर्तीजापुर चे अध्य क्ष श्री राहून तिडके, प्रमुख अतिथी म्हणून श्री. मुकुंद सवाईकर मार्गदर्शक म्हणून श्रीस़त गाडगेबाबा स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्षसुभाषराव टाले, तर अतिथी म्हणून कलाविष्कार साहित्य शिक्षण बहू.संस्थेचे अध्यक्ष मिलिंद इंगळे, हातगा़व ग्रामपंचायत सदस्य धिरज धबाले, निलेश चहाकर, शेतकरी नेते अरविंद तायडे यांची उपस्थिती होती. श्रीसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर येथील वृध्दांसमवेत सहभोज करुन वृध्दांचा शुभाशिष घेवून कार्यक्रमाची सा़गता झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल डाहेलकर यांनी केले. सुत्रसंचखलन रितेश शेंदरकर तर प्रशांत पठारकर यांनी मानले.

Discussion about this post