
विलास लव्हाळे जिल्हा प्रतिनिधी..
वैजापूर :
दारू पिऊन पत्नीला गजाने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील बाभूळगाव बुद्रुक येथे सायंकाळी शनिवारी घडली. या प्रकरणी मंगळवारी पती विरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाभुळगाव बुद्रुक येथील शामल विशाल पवार ही सायंकाळी घरात काम करत होती. त्यावेळी तिचा पती विशाल राजेंद्र पवार हा दारू पिऊन घरी आला. तु व मुले मला लागत नाही. असे म्हणून गजाने त्याने शामल ला मारहाण केली. या प्रकरणी शामल पवार हिने दिलेल्या फिर्यादीवरून विशाल पवार विरुद्ध शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सविता वरपे या करत आहेत..
Discussion about this post