

🌸 देवगड: श्री क्षेत्र कुणकेश्वर ची यात्रा दिनांक 26 फेब्रुवारी 2025 ते 27 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. श्री देव कुणकेश्वर ची पहिली पूजा मध्यरात्री एक वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी यांच्या हस्ते देखील पूजा होणार आहे. मध्यरात्री अडीच वाजल्यापासून भाविकांच्या दर्शनासाठी दर्शन रांगा सुरू राहणार आहेत यावर्षी महाशिवरात्रीच्या यात्रा उत्सव एकच दिवसाचा असून एकूण नऊ देवस्वाऱ्या ही.श्री क्षेत्र कुणकेश्वराच्या भेटीसाठी येणार आहेत. श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषद यांना देवस्थानाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिलेली गेली आहे. यावेळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश वाळके. उदय पेडणेकर,शैलेश बोंडाळे, महेश जोईल, संजय वाळके,दीपक घाडी,आधी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे देवगड महाविद्यालयाच्या वतीने प्रशासकीय यंत्रणा,तसेच आपत्ती व्यवस्थापन,विभागात मदतनीस 100 विद्यार्थी स्वयंसेवक असणार आहेत. सदर विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन शोध,व बचाव प्रथमोपचार, बिनतारी संदेश, यंत्रणा पाण्यातील,व्यक्ती बचाव,पद्धती अशा अनेक बचाव पद्धतीने प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकाद्वारे देण्यात आलेले आहे विद्युत व्यवस्थापनाच्या दृष्टीने संबंधित खात्याने आवश्यक ते कामकाज यापूर्वी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही पूर्ण केलेली आहे. त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा व कुणकेश्वर ग्रामस्थांना कडून भाविकांसाठी समुद्रकिनारी सुरक्षा पथके,सागरी किनारी सागरी सुरक्षा दल असणार आहे. मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आलेले आहेत. त्यात जम्बो कॅमेराचा सुद्धा समावेश आहे. यात्रा मध्ये महाराष्ट्र पोलीस यांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.यात्रा परिसरामध्ये राजकीय बॅनर्स व इतर बॅनर यापासून असुरक्षितता निर्माण होऊ नये यासाठी नियोजन देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्याकडून करण्यात आलेली आहे. रस्त्यावरती बॅनर्स कमानी बांधण्यात मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पूजा ताट विक्रेते व व्यापारी यांना प्लास्टिक पिशव्या विक्री करण्यास व वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच पालकमंत्री जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी,यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय यंत्रणा व देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचेच “यात्रा नियोजन” बैठक पार पाडण्यात आली. किनाऱ्यावरील भागांमध्ये सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था पुरुष व महिलांकरता ठिकठिकाणी कपडे बदलण्यासाठी जागा व्यवस्था असणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा व कुणकेश्वर ग्रामस्थ हे सुद्धा भक्तांच्या सोयीसाठी सुसज्ज राहणार आहेत. गाड्यांची पार्किंगची व्यवस्था सुद्धा राखण्यात आलेली आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेचे थेट प्रक्षेपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात व देशभरात होणार आहे. संपूर्ण यात्रा परिसरामध्ये एल. इ. डी. स्क्रीन द्वारे होणार आहे. त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्ट मार्फत उत्तम दर्जाचे चविष्ट गुळ बुंदी लाडू प्रसाद म्हणून विक्रीसाठी सुसज्ज राहणार आहेत. श्री देव कुणकेश्वर भेटीकरता एकंदर नऊ देव स्वाऱ्यांची नोंद झालेली असून यात्रेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सहा पासून येणाऱ्या देवस्वारीचे आगमन सहा वाजेपासून होणार असल्याने गर्दीचे प्रमाण वाढणार आहे. तसेच सायंकाळी सहा वाजता ते रात्री बारा वाजेपर्यंत भाविक भक्तांनी सहकार्य करावे असे आव्हान सुव्यवस्था राखण्यास देवस्थान ट्रस्ट व संबंधित सर्व शासकीय प्रशासकीय यंत्रणा, सुलभ कशी होईल शिवभक्तांची गैरसोय होणार नाही अशी सर्वांना कळकळीची विनंती आहे. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश वाळके खजिनदार उदय पेडणेकर,शैलेश बोंडाळे,महेश जोईल, संजय वाळके, अतिशय परिश्रम घेऊन यात्रा सुलभ व यात्रेचे कार्यक्रम व्यवस्थित कसे होतील याची दक्षता घेत आहेत 🌸 देवगड तालुका प्रतिनिधी अमोल शिर्के सारथी महाराष्ट्राचा 🌸७८२२००७४३१🌸
Discussion about this post