
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ४१ व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी कु. कल्याणी दिनेश ठाकरे हिला उन्हाळी २०२४ मध्ये झालेल्या विज्ञान पारंगत परीक्षेत गणित विषयात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर गणित विभागामधून सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल श्रीमती प्रभाताई शंकरराव अढाव सुवर्ण पदक महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल व अमरावती विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानीत करण्यात आले.
अमरावती विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानीत
यावेळी मुख्य अतिथी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, कुलगुरू डॉ. मिलिंद बाराहते, प्र – कुलगुरू. डॉ. महिंद्रा ढोरे, कुलसचिव, डॉ. अविनाश असणारे व सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. एच. आर. देशमुख तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी व सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित होते. कु. कल्याणी ठाकरे हिने आपल्या यशाचे श्रेय वडील दिनेश ठाकरे आई सौ. भारती ठाकरे यांना दिले. धामणी मानोरा या ग्रामीण भागातून सर्वसामान्य कुटुंबातील एका विद्यार्थिनीने एवढे मोठे घवघवीत यश प्राप्त केले याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे..
Discussion about this post