पुरंदर विमानतळास ‘राजे उमाजी नाईक’ यांचे नाव द्यावे – गोपीचंद पडळकर यांची विधिमंडळात मागणी
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात भिवडी गावात जन्म घेतलेल्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव करून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. ते देशासाठी फासावर जाणारे पहिले क्रांतिकारक ठरले. त्यांचा स्वातंत्र्य संग्रामातील योगदान अमूल्य आहे.
पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या विमानतळास ‘राजे उमाजी नाईक’ यांचे नाव द्यावे, अशी मागणी बहुजन समाजाचे नेते व विधान परिषद सदस्य मा. श्री. गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळात केली. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पुरंदर तालुक्यात जन्मलेला हा महान योद्धा विस्मृतीत जाऊ नये आणि त्यांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी विमानतळाला त्यांचे नाव देणे आवश्यक आहे.
या मागणीला बहुजन समाजासह विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असून, सरकारने लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या महत्त्वपूर्ण विषयाला पाठिंबा देणाऱ्या सर्व समाजबांधवांनी आणि समर्थकांनी आमदार पडळकर यांच्या या प्रयत्नाचे स्वागत केले आहे.
संघटनांचेही सहकार्य
या मागणीसाठी श्री दौलतनाना हाडुबाई उमाजी शितोळे, संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष (जय मल्हार क्रांती संघटना) आणि उपाध्यक्ष (राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य) यांनी देखील सहकार्य दर्शवले आहे.
जनतेचा सकारात्मक प्रतिसादबहुजन समाजाच्या नेतृत्वाने घेतलेल्या या पुढाकारामुळे राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद उमटत आहे. पुरंदर विमानतळाचे नाव राजे उमाजी नाईक विमानतळ ठेवले जावे, अशी जनतेचीही मागणी आहे.–
Discussion about this post