

अकोट :
(डॉ. संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी ) सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या खीरकुंड या गावी मध्यरात्री घराला आग लागून हजारोच नुकसान झाले आहे. अकोट तालुक्यातील खीरकुंड येथील भैयालाल तांडील यांच्या राहत्या घराला मध्यरात्री अचानक पणे आग लागली या आगीत दोन बकऱ्या मृत्यूमुखी पडून, घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्य, आणी 1 ते दीड किंटल कापूस भस्मतात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी किशोर सोलकर यांना घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कासदे, दयाराम कासदे यांच्या सह गावकरी उपस्थित होते. आगीत नुकसान झालेल्या भैय्यालाल तांडील यांना शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी यावेळी उपस्थित गावकरी यांनी केली..
Discussion about this post