प्रा.दिलीप नाईकवाड,
सिदंखेडराजा : तालुका प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आता केवळ भारतातच नाही तर विदेशात सुद्धा ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसं राहतात त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती तसेच अनेक भारतीय उत्सव साजरे होत आहे.
याला मुस्लिम राष्ट्र सुद्धा अपवाद नाही.आखाती देश अबुधाबी या ठिकाणी शिवजयंती साजरी होत आहे. या शिवजयंती चे अध्यक्ष पद केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे भूषविणार
आहेत. आखाती देशात स्थायिक झालेले मराठी बांधव ,नवीन पिढीला छत्रपती शिवरायांचा इतिहास याची ओळख व्हावी यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत.दुबईतील इन्स्पायर इव्हेंट अँड प्रमोशन व स्थानिक भारतीय रहिवासी यांच्या संयुक्त उपक्रमातून अबुधाबीत हिंदू मंदिर या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन झालेले आहे.या कार्यक्रमाचे निमंत्रण केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना देण्यात आलेले आहे. अबुधाबी या ठिकाणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव तेथील स्थानिक भारतीयांशी सुद्धा संवाद साधणार आहेत..
Discussion about this post