
प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम राष्ट्रवादी करणार प्रदेशाध्यक्ष तटकरे यांची ग्वाही
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासद नोंदणीवर विशेष भर द्यावा प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी केल्या सुचना

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले. महायुती सरकारमध्ये घटक पक्ष म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अनेक योजना व विकास कामांना प्राधान्य दिले आहे. नुकतेच जानेवारी महिन्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे राज्यस्तरीय विशेष निमंत्रित पदाधिकाऱ्यांचा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सभासद नोंदणीचे ध्येय निश्चित करण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता तसेच सर्वसामान्य व्यक्तींना पक्षाचे विचारधारा पटवून सभासद नोंदणी करण्यासाठी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूचना केल्या होत्या.

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्ष अव्वल स्थानी आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सर्वाधिक उमेदवार निवडून येतील याची खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मानस आहे याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची तालुका रोहा जिल्हा रायगड, सुतारवाडी गीताबाग येथे त्यांची भेट घेऊन त्यांना शाल, टोपी, तटकरे सहकुटुबांची फोटो प्रतिमा भेट देऊन, भला मोठा हार घालून त्यांचा विशेष सत्कार केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, माणिक कांबळे, महादेव राठोड, दीपक आरगेल आदींची उपस्थिती होती. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता हाच पक्षाचा मुख्य कणा राहणार आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा, विकासात्मक कार्यपद्धत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनकल्याणर्थ घेतलेले महत्त्वाचे निर्णय सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणीवर भर द्यावा अशा सूचना देखील यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी किसन जाधव यांना दिल्या. सोलापूर शहरांमध्ये ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याची ग्वाही प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना या सत्कारा दरम्यान दिली.
Discussion about this post