दि.२४/०२/२०२५ लोहा (प्रतिनिधी) जूना लोहा येथे अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
प्रसादावरील कीर्तन डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पूर्णा यांची उपस्थिती लाभली. प्रसारमाध्यमांनी संतांचे विचार समाजामध्ये पोहोचवणे ही काळाची गरज असून गेली आठ दिवसापासून “आपला नांदेड जिल्हा” या यूट्यूब चैनल वर होत असलेल्या कीर्तन सेवेचा आनंद हे नक्की समाजापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
या निमित्त सप्ताह आयोजक कमिटी तर्फे चैनल चे संपादक हणमंत पांचाळ यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकार मंडळी आणि प्रसारमाध्यमांनी सामाजिक कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवून संतांचे विचार नेहमी समाजामध्ये प्रसारित करावे असे आवाहन डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याकडून करण्यात आले.
यावेळी उपस्थिती ह.भ.प. आत्माराम महाराज, पत्रकार विलास सावळे, प्रेसफोटोग्रापर विनोद महाबळे, संजयजी कहाळेकर, दत्ता भाऊ शेटे, राष्ट्रीय जंगम समाज तालुका अध्यक्ष अमोल स्वामी, कैलास कहाळेकर, लक्ष्मणराव कांजले, गंगाधर स्वामी आदी मान्यवर तसेच असंख्य भक्तांची उपस्थिती होती.

Discussion about this post