संपूर्ण जिल्ह्यात सध्या गाजत असलेला सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वाढीव घरपट्टी च्या विषयावर पालकमंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांनी महापालिकेमध्ये आढावा बैठक घेतली आणि घरपट्टी बाबत आयुक्त शुभम गुप्ता यांच्या कडून या विषयाबाबत सखोल माहिती घेऊन काही निर्णय घेण्यात आले. यामध्ये सुधारित घरपट्टी नोटिसीला ज्यांनी हरकती घेतल्या आहेत त्यांना एक महिन्यांची स्थगिती देण्यात आली आहे तर ज्यांनी दिलेल्या मुदतीत हरकती नोंदवल्या नाहीत त्यांनी महापालिकेमध्ये घरपट्टी चा भरणा करावा कारण कर्मचाऱ्यांचे पगार आणि महापालिका क्षेत्रामध्ये राबवण्यात येणाऱ्या नव्या योजना या घरपट्टी करांवर अवलंबून असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर सर्वच आक्षेपाबाबत द्विसदस्य समिती स्थापन केली असून या समितीच्या अहवालावरून पुढील निर्णय घेतले जातील तेही नागरिकांच्या हिताचे असतील असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रामध्ये काही घरांच्या बांधकामांचे परवाने नसल्याचे दिसून येत आहे त्यांनी तीन महिन्यांमध्ये बांधकाम परवाने घ्यावेत आणि नियमित एकपट घरपट्टी भरावी. द्विसदस्य समिती साठी अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख आणि महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांची नेमणूक आम्ही केली आहे हि समिती नागरिकांकडून आलेले सर्व प्राकारचे आक्षेप हरकतीचा सखोल अभ्यास करेल त्याप्रमाणे आम्हाला अहवाल देईन त्यानुसार घरपट्टी मध्ये सूट तिबेट किंवा सवलत देण्याबाबत विचार करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या मालमत्ता धारकांनी आपली मालमत्ता भाडेपट्टी वर दिली आहे अशा मालमत्तांच्या घरपट्टी बाबत नक्कीच विचार करून घरपट्टी कशी कमी आकारली जाईल याचाही अभ्यास हि समिती करेल. सध्या जलनिःसारण कराबाबत कमी करण्याबाबत आजच आम्ही नगरविकास खात्याला पत्रव्यवहार करणार आहोत. या आढावा बैठकीसाठी खा विशाल पाटील, आयुक्त शुभम गुप्ता, आ डॉ सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ तसेच कर संकलन विभागाच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post