मागील काही दिवसांपूर्वी बीडचे जिल्हाधिकारी यांचे वाहन जप्तीचे आदेश कोर्टाने दिले होते हे प्रकरण ताजे असतानाच, आता पुन्हा बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना कैद करण्याचे आदेश बीडच्या न्या. दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्रीमती पिंगळे मॅडम यांच्या न्यायालयाने दिले आहेत.
भूसंपादन मावेजा थकविल्याप्रकरणी हे आदेश काढण्यात आले आहेत. लघु पाटबंधारे विभागाने प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा देण्याचे आदेश २०१८ मध्ये देण्यात आले होते; मात्र त्याची पूर्तता न झाल्याने सोमवारी न्यायालयाने आदेश काढून १३ लाख १९ हजार रुपये बीडचे जिल्हाधिकारी व लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कैद करून ही मावेजाची रक्कम त्यांच्याकडून २१ मार्च पूर्वी भरणा करून घेण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले.
दिवाणी कैद म्हणजे काय?
दिवानी कैद म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे असणारे थकीत कर्ज किंवा प्रलंबित रक्कम फिटेपर्यंत तुरुंगात टाकण्याचा आदेश देणे. यात ज्याचे पैसे येणे आहेत ती व्यक्ती दिवाणी अटकेची मागणी करते व अटक झालेल्या व्यक्तीचा उदरनिर्वाह भत्ता रक्कम देखील न्यायालयात भरते.
Discussion about this post