अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी: वैभव फरांडे (9356204072)
श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेचे महाराजा जीवजीराव शिंदे महाविद्यालयामध्ये एमपीएससी द्वारे निवड झालेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला.महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) द्वारे 2024-25 या वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या महसूल सहायक या पदासाठी महाविद्यालयातील वागस्कर नूतन,प्रदीप गोडसे,अंकित धनवटे, या विद्यार्थ्यांची निवड झाली.तसेच खेतमळीस तुषार व औटी तुषार या विद्यार्थ्यांची पोलीस उपनिरीक्षक या पदांसाठी निवड झाली.शशी रंगत ( अन्न सुरक्षा अधिकारी),महेश जांभळे आरोग्य निरीक्षक,विकास हिरडे (रासायनिक सहाय्यक),श्रद्धा दांगडे ( वन सहायक) या पदासाठी निवड झाली तसेच शेख अरबाज (एसरपीएफ कॉन्स्टेबल),कचाटे पवन ,मोरे सुप्रिया,जागृती मचिंदर यांची महाराष्ट्र पोलीस, जगताप अमोल,दांगडे रामेश्वर,लगड प्रदीप,वाबळे वैभव यांची सी आय एस एफ कॉन्स्टेबल या पदांसाठी,कृष्णा पांडुळे,वर्षा काकडे यांची शिक्षक पदासाठी निवड झाली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे सर, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे सर ज्यु उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे यांच्या हस्ते सत्कार केला.या प्रसंगी विज्ञान विभाग प्रमुख डॉ. नितीन थोरात ,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ सुदाम भुजबळ,डॉ. रमेश थोरात,डॉ. राजेंद्र ठाकरे,डॉ. देवकर बापू, डॉ. गायकवाड राहुल,स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्रा. ढवळे ए आर, डॉ. राजाराम कानडे,विध्यार्थी कल्याण विभाग प्रमुख डॉ. वाघिरे हरिभाऊ, प्रा.वागस्कर सर उपस्थित होते.
Discussion about this post