वाढ विक्री योजनेत मोटारसायकल मिळाल्याचे सांगून महिलांकडून पैसे घेऊन फरार..
सध्या ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यावर लकी ड्रॉ असे सांगून कुपन फाडण्यास सांगितले जाते व तुम्हाला बक्षीस लागले आहे असे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार शेवगाव तालुक्यातील मुंगी या गावी घडला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि,रामकृष्ण बचत बाजार नावाने विक्री वाढ योजनेतर्गत मुंगीत दि. ७ फेब्रुवारी तीन अज्ञात इसम आले. व त्यांनी शकूर बेग यांच्या नावाने कुपन काढले व त्यानंतर तुम्हाला डीलक्स गाडी बक्षीस म्हणून लागली आहे. तुम्ही २० हजार रुपये द्या व आम्ही तुम्हाला गाडी पोहच करतो असे सांगितले. त्यानंतर शकूर बेग यांच्या पत्नीने त्यांना रोख स्वरूपात २० हजार रुपये दिले. शकूर बेग घरी आल्यानंतर त्यांना फोन आला कि, आम्ही तुमची गाडी घेऊन येत आहोत तर तुम्ही आम्हाला गाडी पोहच करण्याचा खरंच १ हजार २०० रुपये पाठवा तर लगेच त्यांनी १ हजार २०० रुपये फोनपे द्वारे पाठविले. त्यानंतर तो फोन न लागल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलीस निरीक्षक शेवगाव यांना तसा तक्रार अर्ज दिला आहे..
Discussion about this post