प्रतिनिधी.नित्यानंद मोरे
बहुजन युथ पॅंथरचे सातारा जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन बिहार बौध्दगया येथे बौद्ध भिक्खू यांच्यावरील अन्याय संबंधित प्रशासनाने थांबवावा.अंकित वाघमारे सातारा जिल्हाध्यक्ष.
बौद्धगया बिहार येथे गेली नऊ दिवसांपासून बौद्ध भिक्खू व बौद्ध अनुयायी हे सर्व आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत आहेत बिहार बौद्धगया येथे गेली अनेक वर्ष एकोणीसशे पन्नासपासुन बौद्ध भिक्खू ब्राह्मण पुरोहित आपले कर्तव्य कारभार नियमितपणे बजावत आहेत.परंतु सध्याच्या काळात ब्राह्मण पुरोहित हे बौद्ध भिक्खू यांना आपले कर्तव्य कारभार बजावताना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम करत आहेत.त्यांच्या त्रासाला कंटाळून बौद्ध भिक्खू व बौद्ध अनुयायी हे गेली नऊ दिवसांपासून आंदोलन करत आहेत संबंधित प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन ब्राह्मण पुरोहित यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा सर्व मित्र पक्ष एकत्रित करून संबंधित बिहार प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी पुढील येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार यावेळी बहुजन युथ पॅंथरचे जिल्हाध्यक्ष अंकित वाघमारे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post