
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे..
मानोरा :
आयुष्याचा विचार केला तर आपल्याला त्याच्याकडे पाहण्याचा,त्याबद्दल विचार करण्याचा प्रत्येकाचाच दृष्टीकोन फार वेगवेगळा पाहायला मिळतो.प्रत्येक क्षण हा आपल्याला वेगळा अनुभव देऊन जातो.काही क्षण आनंदाचे असतात तर काही क्षण मात्र दुखाचे हे आपल्याला मान्यच कराव लागेल.अर्थातच संघर्ष,विजय,आनंद,दुख या प्रत्येकच खणातून आपण काही ना काही शिकत असतो एका शब्दात सांगायचे झाले तर आयुष्य म्हणजे खरतर एक सुंदर प्रवास आहे,जसा प्रवास करतांना आपल्याला विविध टप्पे येतात,विविध वळणे येतात,कधी अडचणी येतात,कधी सुंदर आनंदाचे क्षण येतात तर कधी त्यातून मिळणारा अनुभव सुद्धा.
आयुष्याला जर आपल्याला अधिक आनंदी,अधिक समाधानी आणि अधिक अर्थपूर्ण बनवायचे असेल तर आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी निश्चितच समजून घेणे अत्यावश्यक आहेत.तर सुरुवात करुयात आपण आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटकापासून म्हणजेच पैसा,बऱ्याचदा अशी धारणा आहे की पैसा म्हणजेच सर्वस्व,पण एक लक्षात ठेवा पैसा हा जीवन जगण्यासाठी नक्कीच अत्यावश्यक आहे,पण पैसा कमवण्याचा नादात आपण आपली नीतिमत्ता आणि जीवन जगण्याची मूल्य मात्र विसरून जातो. यानंतर दुसरा टप्पा म्हणजे नाती, बऱ्याचदा आपण बघतो की नात्यासंबंधात पैशाच्या स्वरूपात व्यवहार केला जातो. पण हाच व्यवहार जेव्हा काही स्वरूपात मागेपुढे होतो तेव्हा मात्र ते नातं ,नातं राहत नाही मग अशा मुळे कुठेतरी गैरसमजापायी आपण त्यांना विसरून जातो त्यामुळे एवढी काळजी घ्या की पैशामुळे आपली आयुष्यभर जपून ठेवलेली प्रेमळ नाती तुटणार नाही. पैसा आणि प्रसिद्धी हे प्रत्येकालाच मिळवणं सोप आहे मात्र आपण आयुष्यभर जी प्रेमळ नाती जपन ठेवतो तर ती नातं जपणं हेच खऱ्या अर्थाने आपला पण यश समजावं. कारण नातं म्हणलं तर त्यामध्ये विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे बऱ्याच दाणे गैरसमज नात्या नात्यांमध्ये होतात त्यामुळे आपल्याला आपला आयुष्य जगताना क्षमाशील बनणे सुद्धा गरजेचे आहे , प्रत्येक व्यक्तींकडून काही ना काही चुका होतच राहतात तर मोठ्या मनाने त्या स्वीकार सुद्धा करता आला पाहिजे आणि त्याचबरोबर माफ सुद्धा करणं आलं पाहिजे कारण माफ करणं हे स्वतःच्या मानसिक शांतीसाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजेच आरोग्य. येथे आपण आरोग्याला दोन वेगवेगळ्या टप्प्यात विभागूयात पहिलं म्हणजे शारीरिक आणि दुसरं म्हणजे मानसिक, शारीरिक बाबीचा विचार केला तर तुम्हाला नियमित व्यायाम करताच आला पाहिजे त्याचबरोबर संतुलित आहार घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्यासाठी किंवा मनशांतीसाठी ध्यान किंवा योगा नियमित करावा कारण शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य ही तितकाच महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात ताण-तणाव येतोच आणि तो तणाव कमी ठेवण्यासाठी आपण नेहमीच आपल्या आयुष्यात सकारात्मक विचारांचा अवलंब केला पाहिजे. बऱ्याचदा आपण आयुष्य व्यतित करताना सुख म्हणजे काय किंवा समाधान म्हणजे काय याचा शोधच घेत नाही. त्यामुळे सुख आणि समाधानाचा शोध घेतलाच पाहिजे. कारण सुखाचा जर विचार केला तर सुख म्हणजे फक्त ते बाहेरून मिळणारी गोष्ट नसते तर ती आपल्या मनातून येते. बऱ्याचदा आपण मोठ्या गोष्टींमध्येच सुख शधत राहतो त्यामुळे मोठ्या गोष्टींमध्येच नव्हे तर लहान लहान क्षणांमध्ये आपण आपला आनंद शोधला पाहिजे. आणि समाधानाचा विचार जर केला तर समाधान तर प्रत्येक गोष्टीतच असते पण ते शोधण्याची दृष्टी सुद्धा आपल्यात असली पाहिजे.
आयुष्य म्हणजे फार अनमोल ठेवा आहे त्याचा आनंद सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात काही घटना घडवून जातात आणि त्याच घटनांचा विचार करत करत आपण भूतकाळाच्या आठवणींमध्ये सडकून राहतो किंवा भविष्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची चिंता आपण करत राहतो त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात असू द्या की आजचा दिवसच सर्वोत्तम असतो आणि तो आपल्याला जगता आला पाहिजे त्यामुळे फक्त वर्तमानातच जगायला शिका. प्रत्येकालाच माहित आहे की आजकाल धावपळीचं हे जग आहे आणि प्रत्येकच गोष्टीसाठी आपण सतत सतत धावपळ करत राहतो पण आपण एका गोष्टीला विसरतो की ही धावपळ करताना आपलं शरीरच नाही तर मन सुद्धा थकत असते तर आपल्याला जर असं वाटत असेल की शरीर आणि मन या दोन्ही गोष्टीं व्यवस्थित रित्या रहाव्यात तर आपण आपण स्वतःसाठी वेळ काढणे सुद्धा महत्त्वाच्या कारण बऱ्याचदा आपण इतरांसाठी जगता जगता स्वतःसाठी जगणं विसरून जातो त्यामुळे कधीकाळी आपल्या आवडीच्या गोष्टी सुद्धा केल्या पाहिजे जर एकांत वासात जायचे असले तर फार सुंदर माध्यम म्हणजे निसर्ग त्यात वेळ घालवा त्याचबरोबर सुमधुर संगीत सुद्धा ऐका ज्यामुळे मनाला आनंद होईल. खूप प्रवास करा कारण प्रवासातून आपण अनेक गोष्टी शिकत राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळेल त्या गोष्टी तुम्ही करा.
पण हे सगळं करताना मात्र तुम्ही माणुसकी विसरू नका, माणुसकी सुद्धा आपल्याला जपता आली पाहिजे. आपल्याकडून जमेल तेवढी गरजूंना मदत करा ,प्रेम द्या, लहान सहान जे आनंदाचे क्षण आहेत ते इतरांसोबत सुद्धा शेअर करा ज्यामुळे आपल्या सोबतच त्यांना सुद्धा आनंदाची प्राप्ती होईल. आपण या पृथ्वीतलावावर काहीतरी उद्देश घेऊन किंवा काहीतरी चांगलं करण्यासाठी आलो आहोत हे मात्र कायम लक्षात ठेवा. आपण नेहमीच पाहतो की जे आपण पेरतो ते आपल्याला कित्येक पटीने परत मिळते त्यामुळे तुम्ही इतरांना काय देता हे तुमच्यावर अवलंबून आहे. प्रत्येक दिवसच आपल्याला काही ना काही तरी नवीन शिकवत असतो. या बदलत्या जगात स्वतःला सुद्धा बदलता आले पाहिजे. विविध विषयांवर वाचन करता आला पाहिजे, नवनवीन कौशल्य आत्मसात करता आले पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे स्वअनुभवातून आपण कायम शिकत आलो पाहिजे. आयुष्य आहे आयुष्यात प्रत्येकच प्रकारचे लोक येतात आणि जातात त्यामुळे नकारात्मक असणारे लोक किंवा सवयी यांना दूर सारून सकारात्मकतेकडे आपले पावलं वळले पाहिजे. अनेक वेळेस आपण घाई घाईने निर्णय घेतो मग तेव्हा ते मात्र चुकतात म्हणून आपले निर्णय घेताना ते विचारपूर्वकच असले पाहिजे कारण कठीण परिस्थितीत आपण अस्ताव्यस्त होऊन जातो त्यामुळे जेव्हा आपलं मन शांत असेल किंवा आपण स्वतःवर संयम ठेवू त्यावेळेसच तुमचा निर्णय तुम्हाला योग्य घेता येईल किंवा आयुष्यात येणाऱ्या समस्या सोडवता येईल.
शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मृत्यू, एक काम लक्ष असू द्या की आपण या जगात कायम राहणार नाही आहोत त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे प्रत्येक क्षणातच आपल्याला आनंद घेता आला पाहिजे आणि अनेकदा आपण विविध भीतीमुळे किंवा आपल्या डोक्यात येणाऱ्या शंका कुशंकामळे आपला स्वतःचा आयुष्य मर्यादित करून ठेवतो, शेवटी सरणावर जाताना ज्यावेळेस तुम्हाला स्मशानात नेतात किंवा तुमच्या ज्या वेळेस निधन होते त्यावेळेस तुम्ही किती पैसे कमावलेत याचा लोकांना काहीच घेणं देणं नसते तर तुम्ही तुमचं जीवन व्यतीत कसं केलं किंवा तुम्ही कशा जगलात हे लक्षात ठेवतात. म्हणूनच म्हणतो की आयुष्य हे एका दिवसात समजण्यासारखं नसतेच तर त्यातील प्रत्येकच दिवस जगून आपण शिकायला पाहिजे. प्रत्यक्ष महत्त्वाचा असतोच तो मनापासूनच जगला पाहिजे.शेवटी १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या आनंद चित्रपटातील राजेश खन्ना यांचा मला एक डायलॉग आठवतो”बाबुमोशाय जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही..
रंजित उंदरे(समुपदेशक)
९०९६३३३७४०
Discussion about this post