वाई प्रतिनिधी: शर्मिला बाबर
शिव संपर्क दौरा निमित्त महाबळेश्वर, वाई, खंडाळा तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक यांच्या उपस्थितीत मिटींग पार पडल्या. यावेळी सह संपर्कप्रमुख श्री.एकनाथ ओंबळे साहेब, जिल्हाप्रमुख श्री. चंद्रकांत जाधव साहेब, महिला जिल्हा संघटक शारदाताई जाधव, उपजिल्हाप्रमुख श्री. प्रदीप दादा माने, विधानसभा संघटक, विभाग प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख, व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी वाई धोम कॉलनी येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी वाई यशवंतनगर लाखानगर येथून ललित लाखे,केतन पाटणकर, अजय गाडे, सिद्धार्थ लाखे, ओमकार जावलीकर, प्रथमेश जावलीकर, लोकेश कुडाळकर, सिद्धार्थ जावली कर, सुरज गाडे, जितेंद्र लाखे, अभिषेक यादव, उमेश यादव, माऊली कुडाळकर, सोहेल जावळे, धीरज जावळे, व त्यांचे सहकारी अशा अनेक लोकांचा हा पक्षप्रवेशाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी त्यांचे शिवसेनेत जाहीर स्वागत केले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हिंदुत्वाचा वारसा शिवसेनेच्या माध्यमातून पुढे नेत असताना राज्यभरातून नागरिकांचा भक्कम पाठींबा शिवसेनेला लाभतो आहे. त्यामुळेच विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते संघटनेशी जोडले जात आहेत. याच शिवसेना परिवारात प्रवेश घेत शिवसेना अधिक भक्कम झाली आहे. यापुढे देखील याच पद्धतीने मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतील यावेळी वाई तालुका येथील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.🚩
Sharmila Babar Wai 8329989427
#Shivsena #EknathShinde #Maharashtra
Shivsena – शिवसेना🚩


Discussion about this post