दिनांक-25.02.2025
सोलापूर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शाळेतील विद्यार्थि, गामस्थ आणि महिला भगिनी यांनी कोथाळे येथे शिवजयंती निमित्त पाच दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
19 फेब्रुवारी रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज प्रतिमेचे शिवपुजा, दीपपुजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थीची भाषण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
ग्रामस्थांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.
19 फेब्रुवारी सायंकाळी 7वाजता व्याख्यानकार श्री रणजीत बागल यांचे शिव चारित्र्य या विषयावर व्याख्यान झाले.
20 फेब्रुवारी रोजी विद्यार्थींना अभ्साबरोबर कलागुणांना वाव मिळावा म्हणून कोथाळे ग्रामस्थांच्या वतीने संगीत खुर्ची, लिंबू – चमच्या असे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले.
21 फेब्रुवारी रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले.
23 फेब्रुवारी रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते तसेच ग्रामस्थांच्या हस्ते स्पर्धा मध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थी मधील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
24 फेब्रुवारी रोजी कोथाळे येथे शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. या पाच दिवसाच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व कोथाळे ग्रामस्थांचा सहभाग, विद्यार्थी, महिला भगिनी यांच्या सहकार्याने आंनदी वातावरण शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
Discussion about this post