








शिरूर तालुका प्रतिनिधी..
शिरूर शहर दुमदुमलं “हर हर महादेव!” च्या जयघोषाने – टाळ, मृदुंग, ढोल-ताशांच्या निनादात मिरवणुकीला अभूतपूर्व प्रतिसाद
शिरूर शहरात श्री रामलिंग महाराजांच्या पालखी सोहळ्याने भक्तिरसाचे अपूर्व मांगल्य निर्माण केले. महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर दरवर्षी भरणाऱ्या या यात्रेचा मान शिरूर शहर व पंचक्रोशीतील गावांना लाभतो. यंदा हा पालखी सोहळा ५१व्या वर्षात पदार्पण करत आहे, त्यामुळे उत्सवाची भव्यता आणि भक्तीभाव अधिक वृद्धिंगत झाला आहे.
शिवसेवा मंदिरात महाआरतीने भव्य सोहळ्यास प्रारंभ
शिवसेवा मंदिरात श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशशेठ धारीवाल आणि युवा नेते आदित्य धारीवाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या सोहळ्यात आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, माजी आमदार अॅड. अशोक पवार, ज्येष्ठ पत्रकार नितीन बारवकर, माजी नगराध्यक्ष रवी ढोबळे, विनोद धाडिवाल, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे, दादापाटील फराटे, नगरसेवक नितीन पाचर्णे, अभिजीत पाचर्णे , प्रविण दसगुडे, निलेश गाडेकर, निलेश लंटाबळे,विनोद भालेराव, शरद कालेवार, विठ्ठल पवार, उपसरपंच बाबाजी वर्पे, अनिल बांडे,नामदेव घावटे, नामदेव जाधव, सागर सातारकर, अविनाश घोगरे, किरण पठारे, कृष्णा घावटे, नगरसेवक मंगेश खांडरे, निलेश पवार, अमोल चव्हाण, हाफीज बागवान, संपत दसगुडे, राहिल शेख, एजाज बागवण, फिरोज बागवान, मुश्ताक शेख, अतुल गव्हाणे,अमोल वर्पे, दिनेश पडवळ, सागर नरवडे, रवी लेंडे,नवनाथ फरगडे, अभिलेष घावटे, सचिन घावटे, सोमनाथ बोराडे,निलेश पवार,निलेश जाधव, दिनेश पडवळ, तुकाराम खोले, किरण बनकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरूरचा ऐतिहासिक वारसा जपणारा पालखी सोहळा – टाळ मृदुंगांच्या गजरात शहर भक्तिरसात न्हालं
शहरातील प्रमुख मार्गांवरून पालखीच्या भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. प्रमुख बाजारपेठ, सरदार पेठ, खडकी रोड, स्टॅंड रोड, तसेच विविध प्रभागातून पालखीने मार्गक्रमण केले. “हर हर महादेव! श्री रामलिंग महाराज की जय!” अशा भक्तिरसात न्हालेल्या जयघोषात शिरूर नगरी दुमदुमून गेली.
ढोल-ताशांच्या गजरात, सुमधुर बँडच्या स्वरात व टाळ मृदुंगाच्या निनादात पारंपरिक पद्धतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.
पुष्पवृष्टी आणि विद्युत रोषणाईने संपूर्ण मार्ग उजळून गेला. विविध मंडळांनी भव्य स्वागत कमानी उभारून पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले.
भाविकांसाठी सेवा आणि महाप्रसादाचे भव्य आयोजन*
यात्रेच्या निमित्ताने भक्तांसाठी मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद आणि सेवाकार्याचे आयोजन करण्यात आले.
आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके सोशल फाउंडेशनच्या वतीने सुनील जाधव, स्वप्निल रेड्डी, महेंद्र येवले, सोनू धन्नी,यांनी पाण्याच्या बाटल्या, साबुदाणा वडे वाटप केले.
खिदम फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी असिफ शेख यांच्या वतीने बाजारपेठेत सरबत व केळी वाटप करण्यात आले.
सरदार पेठ येथे महेश बोरा यांनी वडापाव आणि जिलबी प्रसाद स्वरूपात वाटप केले.
पालखी स्वयंसेवक मित्र मंडळाचे अनुकरणीय योगदान
पालखीच्या सजावटीपासून ते शिस्तबद्ध मिरवणुकीपर्यंत श्री रामलिंग पालखी स्वयंसेवक मित्र मंडळाने महत्त्वपूर्ण योगदान दिले.
मिरवणुकीसाठी पालखी आकर्षक फुलांनी सजवली.
भाविकांना सोयीस्कर मार्गदर्शन व सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी विशेष टीम कार्यरत होती.
शहराला भक्तिरसाचा अभूतपूर्व अनुभव..!
यंदाच्या ५१व्या वर्षी झालेल्या श्री रामलिंग महाराजांच्या पालखी सोहळ्याने शिरूर शहरातील सर्व भाविकांना भक्तिरसाचा अनुपम अनुभव दिला. यात्रेच्या निमित्ताने शहरातील वातावरण आध्यात्मिक तेजाने उजळून निघाले आणि प्रत्येकाच्या मनात भक्तीची ज्योत तेवत राहिली.
“श्री रामलिंग महाराज की जय!” च्या अखंड जयघोषात पालखी जुन्या शिरूर कडे मार्गस्थ होणार आहे..
Discussion about this post