
बातमीदार-कु.गणेश राम यादव,आज
सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायत मधील शिवसंग्राम क्रीडामंडळ बल्लाळेश्वरनगर,पाली, कबड्डी संघाचा धुरंधर खेळाडू कु.गंधर्व अनिल मांडवकर याची रायगड जिल्हा किशोरगट कबड्डी संघात निवड झाली आहे. नाशिक येथे चालु असलेल्या महाराष्ट्र राज्य किशोरगट अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरिता तो रायगड संघांचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या शानदार खेळाच्या बळावर त्याची रायगड जिल्हा किशोरगट संघात निवड करण्यात आली आहे. शिवसंग्राम क्रीडामंडळ पाली, रणधुरंधर स्पोर्ट्सक्लब पाली, मातृछाया क्रीडामंडळ कुर्डुस, सर्व सुधागड तालुक्यातील आणि अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने जनतेने कु.गंधर्व मांडवकरचे अभिनंदन करत त्याला पुढील वाटचालीसाठी खुप खुप कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. कु.गंधर्वच्या ह्या यशामुळे सुधागड तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्युज रिपोर्टर-रायगड/पुणे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार- कु.गणेश राम यादव-848301465-कॉल-व्हा..
Discussion about this post