सावखेडा ता. रावेर, प्रतिनिधी
खिरोदा पाल घाटात दिनांक २४ रोजी पालहून एक कार्यक्रम आटपून परतत असताना पत्रकारांना बिबट्याचे दर्शन झाले. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक २४ रोजी लोकमत पत्रकार योगेश सैतवाल, देशदूत पत्रकार संतोष नवले, सावखेडा बुद्रुक सरपंच युवराज कराड, रमेश पाटील, भागवत महाजन हे एका खाजगी वाहनाने कृषी विज्ञान केंद्र पाल येथून एका कार्यक्रमातून परतत असताना चेक पोस्ट नंबर ३२ जवळ त्यांना दूरवर असलेल्या झाडाझुडपांमध्ये बिबट्या चे दर्शन झाले. याबाबत बिबट्यातचा फोटो त्यांनी आपल्याजवळ असलेल्या मोबाईल मध्ये घेण्याचा प्रयत्न केला, परंतु फोटो येऊ शकला नाही. अशा प्रकारे पाल घाटात बिबट्याचा संचार असल्याचे सिद्ध झाले.
वन्यजीव विभाग नाशिक यावल अभयारण्यातील पाल वन्यजीव वनक्षेत्रात वन्यप्राणींसाठी पिण्याच्या पाण्याची तहान भागविणेसाठी कृत्रिम पाणवठे निर्माण केलेली आहेत. त्या पाणवठ्यांमध्ये वन्य प्राण्यांची उन्हाळ्याची तहान भागविणेसाठी टॅंकरने पिण्याचे चांगले पाणी ग्रामपंचायत पाल वरून घेऊन भरले जातात. अशी माहिती वनक्षेत्रपाल के एन सोनवणे यांनी दिली.
दरम्यान “वन्यजीव प्राण्यांसाठी आम्ही आमच्या डिपार्टमेंट करून ठीक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे हौद उपलब्ध केले आहे. त्यामुळे वन्यजीव प्राण्यांची सोय झाली आहे. जर नागरिकांना वन्यजीव प्राणी आढळला तर त्या ठिकाणी फटाके फोडून किंवा सायरन वाजवून त्यांना पळवून लावावे, घाबरून जाऊ नये, ” असे आवाहन रेंज फॉरेस्ट ऑफिसर, वनक्षेत्रपाल के. एन. सोनवणे यांनी केले.
Discussion about this post