

सुशील पवार ,डांग.
सुरतच्या ज्येष्ठ नागरिक कल्याण संघ भटार तर्फे डांग जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या 1100 हून अधिक मुलांना स्कूलबॅग, बिस्किटे आणि शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. बाबला, काटीश, माळगा, बिलबारी, केळ, बिबुपाडा, बर्डीपाडा, वाहुटिया, नकट्याहणवत आदी प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या 1100 हून अधिक मुलांना शाळेतील दप्तर, बिस्किटे व शैक्षणिक किटचे वाटप सर्व शाळांमध्ये वैयक्तिकरित्या करण्यात आले. तसेच नकटायहनवत, बदिनागावठा, बिबुपाडा, बिलबारी प्राथमिक शाळेतील 350 हून अधिक मुलांना दुपारी मिठाईसह स्वादिष्ट भोजन देण्यात आले.या प्रेरणादायी कार्यक्रमात अध्यक्ष अश्विनभाई पटेल, समन्वयक मंगलभाई पटेल, उपाध्यक्ष गोविंदभाई पटेल, मंत्री प्रवीणभाई पटेल, सहमंत्री भिखाभाई पटेल, खजिनदार पाटील आदी उपस्थित होते. सदस्य अमृतभाई पटेल, किर्तीभाई पटेल उपस्थित होते व सर्वांचे आश्रयदाते शंकरभाई पटेल व सुबीर तालुका पंचायत शिक्षण निरीक्षक नवनीतकुमार ए.पटेल हे दोन दिवस देणगीदारांसह शिक्षक मित्र जगदीशभाई, सुनीलभाई व जयेशभाई यांनी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या व शाळेतील सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ,मुलांना आशीर्वाद देऊन संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला..
Discussion about this post