

सुशील पवार, डांग.
डांग जिल्ह्यातील प्रसिद्ध बिलमाळ अर्धनारेश्वर नागेश्वर मंदिर, बरम्यावड गावचे पौराणिक शिवमंदिर, सापुताऱ्याचे नागेश्वर महादेव मंदिर, नवागावचे तवळेगिरी शिवमंदिर, येथील शिवमंदिरात महाशिवरात्रीचा शुभ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माछलीचे 500 वर्षे जुने पुराणिक शिव मंदिर, चिंचलीचे पुराणेश्वर महादेव शिव मंदिर, भेंसकात्री येथील मायादेवीजवळील रामेश्वर शिव मंदिर, आहवा जवळील ,आहवा चे दंडकेश्वर महादेव मंदिर,घोघळी शिवालय, वघई अंबा मातेजवळील शिवालय, शामगहान गावचे शिवमंदिर, हुंबापाडा गावातील शिवमंदिर, मध्ये सर्व भाविक भक्त भल्या पहाटेपासूनच शिवमंदिरांमध्ये” बम बम भोले” आणि” हर हर महादेव “चा नाद दुमदुमला, तसेच बरम्या वड ,मायादेवी, बिलमाळ, निंबारपाडा या गावातील जत्राही आकर्षणाचे केंद्र ठरली असून, ठिकठिकाणी शिवप्रहार, होम-हवन, यज्ञांचे आयोजन करण्यात आले होते. डांग जिल्ह्य़ात मोठ्या शिवालयांच्या बाहेर बिलीपत्र, फळे, नारळ आदी पूजेच्या साहित्याचा व्यवसायही वाढला होता. तसेच महाशिवरात्रीच्या पवित्र सणाच्या निमित्ताने भाविक भक्तीभावात तल्लीन झाले होते.
महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात होणाऱ्या जत्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलिस विभागातर्फे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता..
Discussion about this post