
लोहा प्रतिनिधी…,….. महाशिवरात्री निमित्त यात्रा महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन नसरत सावरगाव येथे करण्यात आले असून आज दिनांक 26 /2 /2025 रोजी शंकर महादेव भगवंताचा महाअभिषेक पार पडला व रात्री नऊ वाजता महाशिवरात्री निमित्त भजन कीर्तनासह वाद्याच्या गजरात मंदिरात भगवंताचे आगमन व दिनांक 27/ 2 /25 रोजी अमावस्या निमित्त महाप्रसाद व रात्री, नऊ वाजता शंकर भगवंताची भजन कीर्तन वाद्याच्या गजरात गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे. तसेच महाशिवरात्रीनिमित्त परिसरात यात्रेनिमित्त विविध महा प्रसादाची दुकाने खेळ व भांडी दुकाने लागलेली आहेत.तसेच दि 28/2/2025 रोजी सकाळी 10 वाजता पासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कुस्तीचे कार्यक्रम पार पडणार आहेत. श्रीफळ कुस्ती बक्षीस 1151 प्रथम बक्षीस 7551, दुती दुतिय बक्षीस 5551, तृतीय 4551 हे बक्षीस गावकऱ्यांच्या वतीने ठेवलेले आहे, तरी या यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या यात्रेत येऊन यात्रेची शोभा वाढवावी असे गावकऱ्यांनी केली आहे..
Discussion about this post