




छत्रपती संभाजीनगर..
शिवजयंती निमित्त आयोजित भव्य बक्षीस वितरण सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित झाले. ज्येष्ठ शिक्षण तज्ञ एस पी जवळकर सरांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारले प्रमुख पाहुणे म्हणून एस के बिरादर सर तर पाहुण्या सारिका धुमाळ मॅडम हे उपस्थित होते. यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात मुलांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त शिव गीतावर नृत्य सादर केले. एस पी जवळकर सरांनी त्यांच्या भाषणात सांगितले राजयोग अबॅकस क्लास हा त्यांना खूप संध्या देत असून इथं विद्यार्थी घडत नसून तर भावी हिंदुस्तान घडतो आहे. सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले.
कोल्हापूर येथे पार पडलेल्या अत्यंत भव्यदिव्य अश्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन 2025 स्पर्धे मध्ये राजयोग प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीचातुर्याची कमाल दाखवत विविध कॅटेगिरीच्या रँक वर उत्तुंग अशी झेप घेत यश संपादित केले.
यामध्ये विशेष करून राजयोग अबॅकस क्लास मधील आदेश वायगुडगे याने भारतातून प्रथम क्रमांक पटकावला. आणि त्याला तब्बल अडीच फूट उंच अशी छानशी ट्रॉफी आणि सायकल बक्षीस मिळाली.
यामध्ये राजयोग क्लासला मोस्ट एनर्जेटिक सेंटर ऑफ द इयर 2025 अवार्ड पटकावला..
विजेत्यांची यादी खालील प्रमाणे :
आदेश वायगुडगे देशात प्रथम
यश टाले देशात दुसरा
आदित्य मांजरे देशात तिसरा
ईश्वरी मांजरे देशात तिसरा
ईशा बोरुडे देशात तिसरा
अपूर्वा डबरासे देशात पाचवा
जीवन गजभारे देशात सातवा
कार्तिक वनारसे देशात आठवा
तृप्ती शिवपूजे देशात नववा
इशिता संकपाळे देशात बारावा
सार्थक आव्हाड देशात तेरावा
वेदिका वडजे देशात तेरावा
इशिका पाटील देशात तेरावा
सार्थक सुस्ते देशात तेरावा
शिवम मिसाळ देशात चौदावा
यश गावंडे देशात पंधरावा
या सर्वांना दोन ते अडीच फूट अशी चमचम करणारी जबरदस्त ट्रॉफी मिळाली तर
बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफी खालील प्रमाणे
दिपक वट्टमवार ,श्रुती निकम, तेजस्विनी मुठ्ठे, समर्थ कोठाळे, समर्थ उगले, साईप्रसाद पतंगे, आदित्य मिसाळ, अतुल मोरे, राजनंदिनी काथार, अपूर्वा रीसे , भाविक सोरमारे, कृष्णा कांगणे राजेश्वरी वनारसे. इत्यादी विद्यार्थी
या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व मोलाचे मार्गदर्शन संचालिका योगिता काथार यांचे लाभले.
यात दिशा वडजे,रविंद्र निकम, योगेश काथार, शितल वट्टमवार याचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मापारी सर तर कार्यक्रमाचे नियोजन वाय एस पाटील सरांनी केले. तर कार्यक्रमात उपस्थित बी बी काथार तलाठी सिल्लोड, आर पी टाकळकर शिक्षक, क्लासचे संचालक योगेश काथार सर, वाहुळे सर, प्रसाद शिंदे, श्रावणी टाक, संजय राठोड, मनीषा गजभारे, ज्ञानदेव आव्हाड इत्यादी मान्यवर व पालक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला..
Discussion about this post