
धाराशिव | परिवहन मंत्री आणि पालकमंत्री असलेल्या धाराशिव जिल्ह्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दयनीय अवस्था चव्हाट्यावर आली आहे. आज दुपारी पवारवाडी पाटीजवळ धाराशिव डेपोची तेर-धाराशिव बस भर रस्त्यात बंद पडली. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होण्यासोबतच प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रेसाठी निघालेल्या प्रवाशांना उन्हाच्या झळा सहन करत तासनतास बसमध्ये अडकून बसावे लागले. विशेष म्हणजे, इतका वेळ उलटूनही मुख्य बस डेपोमधून कोणतीही मदत मिळाली नाही. अखेर कंडक्टर, प्रवासी आणि ग्रामस्थांच्या मदतीने बस ढकलून सुरू करण्यात आली.
धाराशिव जिल्हा महाराष्ट्रभर ओळखला जात असला तरी सार्वजनिक सेवांची अशी बिकट अवस्था कधी संपणार, हा प्रश्न उपस्थित होतो. कधी हा जिल्हा सुजलाम-सुफलाम होणार, की कायमच मागास आणि दुष्काळी म्हणून ओळखला जाणार? प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल सुरूच राहणार का, असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
Discussion about this post