

सोयगाव :
पाण्याच्या व अन्नाच्या शोधार्थ विहिरीत पडलेल्या मादी प्रजातीच्या वानराला वनविभागाच्या स्थानिक पथकाने पट्टीच्या पोहणाऱ्याच्या मदतीने बुधवारी सायंकाळी चार वाजता विहिरीच्या बाहेर काढले.
तिडका शिवारातील गट क्र-४० मध्ये शेतकरी न्याज अहमद शेख यांच्या विहिरीत वानर पडल्याचे बुधवारी सकाळी सात वाजता लक्षात आले होते. स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने या मादी वानरला विहीरीबाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र प्रयत्न असफल ठरल्यामुळे सकाळी नऊ वाजता वनविभागाच्या पथकाला घटनास्थळी बोलाविण्यात आले होते. अकरा वाजेपर्यंत वनविभागाला वानर विहीरी बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.त्यामुळे छत्रपती संभाजीनगर वरून बचाव पथक बोलाविण्यात आले. पथकाला येण्यासाठी वेळ लागणार असल्याने वनविभागाने ईश्वर सपकाळ आणि सर्जेराव पवार या दोन पट्टीच्या पोहणार्याची मदत घेऊन पुन्हा दुपारी बारा वाजता रेस्क्यू मोहीम सुरू केली.
अखेर सायंकाळी चार वाजता विहिरीतील वानर स्थानिक रेस्क्यू पथकाच्या हाती आले आहे. त्यास सात तासांनी विहिरीबाहेर काढले. वैद्यकीय तपासणी करून त्या वानरला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
यावेळी मात्र वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ मात्र घटनास्थळी नव्हते. यावेळी वनरक्षक नितेश मुलताने,नितीन सोनवणे, टी व्ही मनगटे,सोमनाथ पायगव्हान,आदींसह आप्पा वाघ, ईश्वर सपकाळ,सर्जेराव पवार,आदींची उपस्थिती होती.
चौकट :;
-दरम्यान विहिरीतून वानर बाहेर काढण्यासाठी स्थानिक पथकाच्या रेस्क्यू मोहिमेला सायंकाळी चार वाजता यश आल्याने छत्रपती संभाजीनगर वरून बोलाविण्यात आलेले बचाव पथकाला मात्र फुलंब्री पासून च पुन्हा माघारी परतावे लागले होते.
फोटो ओळ : – सोयगाव -१) तिडका शिवारातील विहिरीत पडलेले वानर
२) विहिरीतून वानर बाहेर काढण्यासाठी रेस्कुला यश आल्यावर पथक.
Discussion about this post