
उदगीर/ कमलाकर मुळे :
येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील बीएस्सी (सीएस) व बीसीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी पुण्याच्या ब्लॅक बग सोल्युशन कंपनीच्या वतीने प्लेसमेंट कार्यशाळा घेण्यात आली. संस्था अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा झाली. यात विद्यार्थ्यांना कंपनीचे व्यवस्थापक किरण लिंगोजी यांनी माहिती दिली. सध्या कॅम्पुटर क्षेत्रात होत असलेले बदल आर्टिफिशियलइंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धीचा वापर व प्रभाव व त्यानुसार मनुष्यबळाची मागणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जे विद्यार्थी संगणक शास्त्र विषयात गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेतात. ज्यांची या क्षेत्रात आवड आहे, अशा विद्यार्थ्यांची या कॅम्पस मध्ये निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्लेसमेंट प्रशिक्षणाचे आयोजन संगणक शास्त्र विभागाचे रशीद दाईमी यांनी केलं. यावेळी उपप्राचार्य डॉक्टर शेषनारायण जाधव, प्राध्यापक राहुल पुंडगे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अमर तांदळे, प्राध्यापक आसिफ दाईमी, प्राध्यापक आवेज शेख, प्राध्यापक नावेद मणियार, प्राध्यापक आकाश कांबळे, प्राध्यापक वैष्णवी गुंडरे, प्राध्यापक नम्रता कुलकर्णी, प्राध्यापक वैष्णवी घोडके, प्राध्यापक अनुजा चव्हाण, अमोल भाटकुळे, अपर्णा काळे उपस्थित होते..
Discussion about this post