
संस्कार भारती जिल्हा धाराशिव अंतर्गत नळदुर्ग येथे रामतीर्थ महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने रांगोळी रेखाटन करण्यात आले. याप्रसंगी नळदुर्गच्या अध्यक्ष प्राध्यापक डॉ.जयश्री घोडके, साहित्यिक कविता पुदाले, जिल्हा पदाधिकारी अपर्णाताई शेटे, सौ अनिता महामुनी, पद्माकरराव मोकाशे, प्रफुल्ल कुमार शेटे, डॉ. सतीश महामुनी, नळदुर्ग संघाचे कार्यवाह अँड. धरणे, येथील मंदिराची पुजारी जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सकाळी साडेनऊ ते ११ वाजेपर्यंत रांगोळीचे रेखाटन करण्यात आले.
मंदिराचे मुख्य महंत यांच्या हस्ते सर्व कलावंतांना श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अनदुर संस्कार भारती चे महामंत्री कैलास बोंगर्गे, सौभाग्यवती बोंगरगे , स्थानिक शिवसेना नेते मेजर घोडके , नगरसेवक विनायक अहंकारी, आणि इतर मान्यवर उपस्थित होते..
Discussion about this post