
कागल तालुका प्रतिनिधी :-तानाजी परमणे
कागल तालुक्यातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या ‘कामाचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते बोळावीवाडी (ता. कागल) येथे गुरुवार २७ रोजी सायंकाळी चार वाजता होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, शासनाने यापुढे मुख्य रस्ते आरसीसी म्हणजेच सिमेंट काँक्रीटचे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा २ अंतर्गत कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघात एकूण दहा प्रमुख रस्ते मंजूर झाले आहेत. त्या कामाचा आज शुभारंभ होत आहे.
कागल तालुक्यातील शेंडूर ते हदनाळ राज्य रस्ता – ४ कोटी ६० लाख, कुरुकली ते बेनिक्रे रस्ता ३ कोटी ८० लाख, कसबा सांगाव ते पंचतारांकित एमआयडीसी ते तळसंदे रस्ता ४ कोटी १० लाख, बेलवडे खुर्द- पिराचीवाडी ते सावर्डे बुद्रुक रस्ता – १२ कोटी ६० लाख, बेलेवाडी मासा- बोळावीवाडी, बोळावी ते – नांगरगाव भुदरगड तालुका हद्द रस्ता – ७ कोटी ६० लाख.
गिजवणे- कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ – गडहिंग्लज शेहर मेटाचा मार्ग ते हत्ती बसवाणा रस्ता – ३ कोटी, इंचनाळ ते ऐनापूर रस्ता – ३ कोटी ९० लाख, कडगाव येथे विठलाई देवी रस्ता – ३ कोटी ९० लाख, प्रमुख जिल्हा मार्ग ८३ ते हिरलगे रस्ता – ३ कोटी २५ लाख. उतूर जिल्हा परिषद मतदारसंघ -चिमणे ते बेलेवाडी हुब्बळगी रस्ता – ७ कोटी ५ लाख.
या कार्यक्रमासाठी गोकुळचे संचालक युवराज पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, शशिकांत खोत, सूर्याजी घोरपड़े, ज्योती मुसळे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष शितल फराकटे, मनोज फराकटे, प्रवीणसिंह भोसले, विकास पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे.
Discussion about this post