पांडुरंग जगताप (धारुर प्रतिनिधी)
न्याय मिळे पर्यंत सोबत राहणार असल्याचे दिले आश्वासन
मौजे मस्साजोग ता. केज येथे स्व.संतोष देशमुख यांच्या न्याय मागणीसाठी दिनांक २५ फेब्रुवारी पासून ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
स्व.सरपंच संतोष देशमुख यांची हत्या घडून जवळपास अडीच महिने उलटून गेले आहेत. पण एक फरार आरोपी अद्याप सापडलेला नाही. तसेच काहींना सह आरोपी करण्याची मागणी करण्यात येत आहे. पण याकडे दुर्लक्ष होत असल्याने मस्साजोग ग्रामस्थांनी मंगळवार (दि. २५) पासून विविध सात मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
या पार्श्वभूमीवर मस्साजोग येथे खा.बजरंग सोनवणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी स्व.संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत सोबत राहणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
Discussion about this post