दररोज रात्री रेतीचे उत्खनन सुरूच – मात्र महसूल प्रशासन कोमात
तालुका प्रतिनिधी – समीर बल्की
चिमूर : – चिमूर तालुक्यात अवैधरित्या रेतीची वाहतूक ट्रॅक्टर तथा हयवा व ट्रक द्वारे मोठ्या प्रमाणावर दैनंदिन चोरटा उपक्रम सुरु असून महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. अगदी तहसील कार्यालया समोरूनच याची वाहतूक सुरु असल्याने अधिकाऱ्यांची या माफियासोबत हातमीळवणी तर नाही ना असा? जनतेला उपस्थित झाला आहे. या रेती चोरीच्या वाहतुकी दरम्यान चालक व वाहक तसेच मजुरांनी जिव सुद्धा गमविला आहे.
रात्रीच्या अंधारात बिनधास्त पणे रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरू असून याकडे पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येते परंतु कसल्याही प्रकारची यांच्यावर कारवाई होत नसल्याने व रेती घाट लिलाव न झाल्याने रेती चोरट्यांची सध्याच्या स्थितीत चांदीच – चांदी असल्याचे नागरीकांकडून बोलले जात आहे. चिमूर तालुक्यातील अनेक घाटावर बिनधास्त पणे रेती उत्खनन व वाहतूक सुरू असून उमा नदी पूर्णतः रेती मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.
उन्हाच्या तडाख्यात मुक्या जनावरांना सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावे लागेल असेही चित्र समोर उद्भवणार असून शेती करीता पाण्याचा तुटवडा निर्माण होनार यात काही तिळमात्र शंका नाही तालूका कृषी अधिकारी यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि याकडे गस्त (पेट्रोलिंग) दरम्यान पोलीस व महसूल प्रशासन का बरं लक्ष देत नाही असा प्रश्न ? वारंवार नागरिकांमध्ये उपस्थित होत असल्याने जनतेचा शासकीय यंत्रनेवरील विश्वास गमाविण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी याकडे आवर्जून लक्ष द्यावे अशी सर्व स्तरावरून मागणी केली जात आहे.
Discussion about this post