शशिकांत तांबे -देवळा प्रतिनिधी –
देवळा शहरात दिनांक 26 रोजी सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन विर एकलव्य जयंती दणक्यात साजरी केली.
तसेच देवळा येथिल पाच कंदील येथे विर एकलव्य प्रतिमेचे पूजन देवळा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या हस्ते करण्यात आले.देवळा तालुक्यातील सर्व खेड्यातील आदिवासी बांधव व देवळ तालुक्यातील सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली तसेच सायंकाळी पाच कंदील पासुन विर एकलव्य यांची सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन मिरवणूक काढली मिरवणुकीत प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता त्यामुळे देवळा शहरात काल महाशिवरात्री व विर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
Discussion about this post