मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : तालुक्यातील गव्हा येथे मृद व जल संधारण विभागाच्या वतीने ३३३.९० लक्ष रुपयांचे बंधारा बांधकाम सुरू आहे. सदरील बंधाऱ्याचे पाणी पावसाळ्यात घरात जावू नये व गावातील विहरी कुपनलीका यांची खालावलेली पाण्याची पातळी वाढावी या करीता गव्हा ग्राम पंचायत व गावकरी मंडळीची शासनाकडे नदी खोलीकरण व संरक्षण भींतीची माघणी होती दि.२२/०२/२५ रोजी कांरजा-मानोरा विधानसभा आमदार सईताई प्रकाश डहाके मंहत आ.बाबूसिंग महाराज यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले व खोलीकरण कामाला सुरुवात करण्यात आली . त्यामुळे संबंधित विभागाने दक्षता बाळगून बंधारा बांधकाम करण्याची मागणी रहिवासी नागरिकांमधून होत आहे.
गव्हा गावाच्या मध्यभागातून नाला वाहून जातो. या नाल्याला लागून दोन्ही बाजूच्या काठावर नागरी वस्ती आहे. शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने बंधारा बांधकाम करण्यासाठी कोटी रुपये मंजुरात झाले असुन संबंधित विभागाच्या वतीने बंधारा बांधकामाला सुरुवात झाली आहे. सदरील बंधाऱ्याचे आज रोजी नदीचे खोलीकरण काम पाहता पावसाळ्यात नागरी वस्तीत पाणी घुसण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात या बंधारा निर्मितीमुळे नागरी वस्तीत पावसाळ्यात पाणी जाणार नाही. याची खबरदारी दक्षता घेण्यात येत आहे

Discussion about this post