
*मळगाव इंग्लिश स्कूल मध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्सवात साजरा…* दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.

आज मराठी भाषा दिन. कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी, ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला जातो. याचं मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या प्रशालेमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्सवात सादरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ , सदस्य श्री.दीपक जोशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी पुंडलिक ठाकरे, मुख्याध्यापक श्री.फाले , पर्यवेक्षक श्री.कदम तसेचं शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते

. या दिनाचे औचित्य साधून विविध कविता, समुहगीत, गोष्टी आदी शालेय उपक्रम घेण्यात आले.तसेच प्रशालेचे सहा. शिक्षक श्री.तिवरेकर , श्री.कारिवडेकर ,श्री.बी.बी.सावंत, सौ.सावंत-भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणे केली.
Discussion about this post