शहापूर बसस्थानकाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी – सौ. कल्पना तारमळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला, ठाणे जिल्हाध्यक्षा
दि.२८ फेब्रुवारी : शहापूर / प्रफुल्ल शेवाळे
पुणे स्वारगेट बस स्थानक येथे दोन दिवसापूर्वी तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी खबरदारीं चा उपाय म्हणून शहापूर बस स्थानक येथे महिला, विद्यार्थीनी यांना पोलीस सुरक्षा मिळावी या करिता शहापूर पोलीस निरीक्षक, तहसीलदार, पोलीस उपविभागीय अधिकारी आणि बस स्थानक व्यस्थापक आदी अधिकारी वर्ग यांना निवेदन देण्यात आले.
पुणे स्वारगेट महिला अत्याचार प्रकरणी पुणे पोलिसांनी मध्य रात्री आरोपीला ताब्यात घेतले आहे.. महाराष्ट्र पोलीस त्यांची कामगिरी चोख पद्धतीने पार पाडत आहेत.. पण अशा घटनांना आळा घालणे आणि समस्त महिला भगिनींनी सतर्क राहावे व पोलीस प्रशासनाने सुद्धा आपली गस्त बस स्थानक परिसरात ठेवावी या अनुषंगाने सदर पोलीस संरक्षण देणेबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे.सदर निवेदन प्रत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्य महिला आयोग अध्यक्षा, आणि पोलीस अधिक्षक ठाणे यांना सुद्धा देण्यात येणार आहे.
बस स्थानक परिसरात पाहणी करीत असताना उपस्थित महिला वर्गासोबत सौ. तारमळे यांनी संवाद साधला आहे. अनोळखी इसमानवर विश्वास ठेवू नये, अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नये, यावेळी बस स्थानक परिसरातील कर्मचारी यांना मदतीसाठी विचारणं करावी असा सल्ला संवाद साधतेवेळी सौ. तारमळे यांच्या कडून देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा कल्पना तारमळे, सोबत सहकारी कविता कोर, संगीता तातले आदी उपस्थित होते.
Discussion about this post